Marathi Kavita (Poem),Marathi charolya (चारोळ्या)
खास कविता प्रेमींनसाठी आपण घेऊन आलोत Marathi Kavita(poem) Marathi Charolya ते हि मराठी मध्ये.खालील कविता चारोळ्या या बाजी दराडे यांच्या आहेत.जे तुम्हाला नक्कीच आवडतील अशा आहेत.
Marathi kavita for Love
तुझ्या जवळ येऊन तुला
हळुवार तुझ्या डोळ्यात बघत
कुशीत घ्यावं वाटतंय मला ,
पण लोक म्हणतात ना
काळ आणि वेळ
कधीच कुणासाठी थांबत नाही
आणि तुझ्या माझ्यातील दुरावा
कधीच का संपत नाही .
सांग ना! का कधीच संपत नाही
-बाजी दराडे
समोर उभारलेली तु
रिकामं झालेलं आभाळं
कुठेतरी दूरवर मी
शोधत असतात सगळेच
आगळं वेगळं जग ,
कधीतरी माझ्याशिवाय तु
एकटं राहून बघ …
भयाण रात्र भरून येते
मोकाट अंधाराच्या साथीने
खरी वेळ तीच असते
अस्तित्व सिद्ध करण्याची वातीने….
बाजी दराडे
#मराठीकविता #मराठी
बाहेर येऊन बघशील का?
माणसासारखे माणूस होऊन
कधीतरी जगशील का?
रोजच रोज ऑफिस जा
मग तुला कळेल खरं
गर्दीतून वाट काढत
फिरायचं असतं बरं
ट्रॅफिक, बॉस आणि क्लायंट सुद्धा
जीवावर उठतात बरं
कोण आपलं कोण परकं
सगळंच खोट्याचं खरं
जरा कुठं विसावलं की
जाणीव महागाईची होते
आठवड्याची सुट्टीसुद्धा
बजेट बिघडवुन जाते.
कोणीही सुखी नाही देवा
डोळे उघडून बघ जरा
गाभाऱ्यात मागते कुणी तर
कुणासाठी पायरीचा कोपरा
जमलंच तर एक कर
गर्दी गाभाऱ्यातली कमी कर
पायरीवर कुणी बसले तर
त्याला माणसात बसवं बरं
कुणी आडला नाडला तर
त्याला माणुसकी मिळू दे
दगडापेक्षा माणसं मोठी असतात
गाभाऱ्यात येणाऱ्यांना कळू दे….
बाजी दराडे
Marathi kavita Marathi Charolya
कोसळणाऱ्या थंड धारा
तरीही आतल्याआत पेटत असतो
धगधगता निखारा
कधी शांत होतो
Kadhi भडकलेला असतो
कधी एकाकी असलो कि
मी माझ्याशीच भांडत बसतो
दिवस गेले महिने गेले
वर्षानुवर्षे एकच सल
वर वर माणसासारखे वागताना
आतल्या आत पाशवी खल
कधी कड्यावरचा धबधबा सुसाट
कधी झाडावरचा वारा मुकाट
अंधारातल्या मोकाट वणव्यासारखा
धगधगता निखारा काठोकाठ
बाजी दराडे
मराठी कविता, चारोळी
होतोच कसा कळत नाही,
एकटेच हसणे गालातल्या गालात
वेडेपणाला तुझ्याही हद्दच नाही
बाजी दराडे
वाटलं होत मेली आपल्या हातून आता…
नशीब पटकन गाडीचा ब्रेक लागला नाहीतर…
काय काय डोळ्यासमोर येऊन गेले.
#पावसात चिंब भिजण्यासाठी,
स्मरत अनोळखी #स्पर्शगीत
भिजावे ओल्याचिंब ओठी
बाजी दराडे
#तुला डोळेभरून बघावं .
श्वास बंद करून #कायमचा
फक्त तुझ्या डोळ्यात जगावं
बाजी दराडे
#मराठीकविता #मराठीचारोळी
एक सुंदर सकाळ
मी मागत होतो तुला
एक उज्वल भविष्यकाळ
मी मागत होतो तुला
एक चंदेरी रात
मी मागत होतो तुला
हातामद्धे तुझा हात
मी मागत होतो तुला
एक क्षण एकांत
मी मागत होतो तुला
क्षितिजाचा दूरवर अंत
मी मागत होतो तुला
मिठीत विसावा जरासा
मी मागत होतो तुला
आयुष्यभराचा भरोसा
मी मागत होतो तुला
विश्वास डोळे मिटलेला
मी मागत होतो तुला
ठेवा आयुष्यभर जपलेला
मी मागत होतो तुला
पंचप्राण कानात साठवून
मी मागत राहिलो तुला
एक एक क्षण मागे पाठवून
मी वाट बघुन दमलो
तुझे काहीच उत्तर नव्हते
सोबत दुसरे कुणी आल्यावर
तू मागितले नको ते !
बाजी दराडे
आणि भर पावसातही मी छत्री लपवली….
का कोण जाणे उगीच मनाने
“भिजावं तुझ्यासवे” ही आशा धरली….
असं उभ्या पावसात भिजताना पाहून
तू तुझ्याही नकळत जवळ आलास….
देऊन तुझी छत्री माझ्या हाती
भर पावसात कोरडं ठेऊन गेलास….
-प्रतिभा बाबर पाटील
नात्यात जमवा जमव
वेळ निघून गेली की म्हणायचं
करा नात्याची कमावा कमव ..
रिंकी
Marathi Kavita on love
तुझ्यासोबत एकटं असावं,
तुझ्या माझ्या दुनियेत
चिटपाखरू नसावं
-बाजी दराडे
सगळ्यांशी बंडखोरी माझी,
तुझ्यासाठी सगळ सोडल्यावर
थोडीशी आकड सोडशील का तुझी ?
नको नको ते बोलण्याचं,
त्याच्यासमोर एकाच आव्हान
येणारा कटु शब्द पेलण्याचं
-बाजी दराडे
तु सामोरी येण्याची ,
पापणी मिटत नाही क्षणभर
तिला भीती तुझ्या जाण्याची
-बाजी दराडे
हवंहवंसं वाटतं मला,
मला भेटून गेल्यावर
असंच वाटतं का तुला ?
– बाजी दराडे
Marathi kavita Marathi Charolya
पाहिलं नाव येतं तुझं,
तुला उचकी लागल्यावर पाहिलंच
आठवतं का नाव माझं
– बाजी दराडे
तुझ्या आठवणी सळसळत येतात,
एकाकी हरवलेला मी बघून
अलगद शांत शांत होत जातात
-बाजी दराडे
तू भेटशील का..?
काही क्षण
क्षितिजा पलीकडले
एकांतात पून्हा एकदा
सोबत माझ्या जगशील का..?
जन्मोजन्मी साथ देण्याचा ..
वादा तू केला होता ..
कुठंय तो वादा कुठं गेलीत ती वचनं …
आठवतयं ग सगळं कांही ..
पण नशीबी आलंय केवळ गप्प बसणं …
आपलेसे वाटू लागले.
चोरी .नी का होईना..?
ते बेसावध तरी आले!
सावध राहणे नाही जमत आता।
सावध राहणे नाही जमत आता: कारण
शिरजोरी करणे हेच.
बेसावध झाले!!!
फक्त जगासाठी आहे
तूच सांग असं
कधीपर्यंत जगायचं आहे!
Marathi kavita Marathi Charolya
सखे आठवण तुझी,
अस्ताव्यस्त होत सगळंच
सावरताना धांदल उडालेली माझी
– बाजी दराडे
घाव मुळाशी झाल्यावर ,
हसता हसता किंकाळी विरली
पाशवी अत्याचार झाल्यावर
– बाजी दराडे
थोडे शहाण्यासारखे जगावे,
तुझ्या कुशीत रडताना
फक्त तुझ्याकडे बघावे
– बाजी दराडे
Marathi Kavita Charolya
विरून टाकावं सर्व दुःख,
जमेल तेवढा ताळमेळ बसवुन
घे हाताशी आलेले सुख
– बाजी दराडे
अवचित एका संध्याकाळी
विरून टाकू जीव आपुले
अशाच एका कातरवेळी
– बाजी दराडे
उन्हात चैत्राची पालवी फुलणं,
संध्याकाळच्या कुंद हवेत
तुळशीचं एकाकी धुंद होणं ….
-बाजी दराडे
पण तरी ही एक सांगतो किव्हा व्यक्त करतो ………..
तुझ्या आठवणी सदैव
ओंजळीत राहतील !
तुला म्हणून सांगतो
माझ्या मनी सदैव तूच राहशील !!!!
-संदीप सुर्वे
हवं ते मिळत जातं
उजेडात काटेरी कुंपण
सीमारेषा दाखवुन देतं…
-बाजी दराडे
होती जखम ती ताजी
एक खपलीची खूण
सखे आठवण तुझी
-बाजी दराडे
होत बोडकं शिवार
ढग भरून आणतं
तुझ्या आठवणीच वार
-बाजी दराडे
आठवणींत अजूनही गोठलेला,
देहभान विसरून क्षणार्धात
अनामिक आकर्षणाने झपाटलेला…
-बाजी दराडे
#मराठीकविता #चारोळी
मनाच्या कुपीत खोलवर,
तुझं माझं मेतकुट सुरुय
कशाला सांगू जगभर …
-बाजी दराडे
काठोकाठ भरून वाहणारी,
ओसरून गेल्यावर पूर
डोळ्यात भरून राहणारी….
-बाजी दराडे
लोकांना वाटू दे काहीही चालू ठेऊ आपलं बुंगाट
तू एक काम जमलंच तर कर
माझ्या वाट्याचे सुख तुझ्या ओंजळीत भर
सापडतील तुला तुझ्या आठवणींचे मोती
आठवणींच्या आभाळात जणु चांदण्यांची गिनती
वेड्यासारख वागायचं तरी शहाणपण घेऊन
कधीतरी भेटशील बागेत गुपचूप संध्याकाळी येऊन
तुझ्या माझ्या घराला जोडलेल्या अगणित वाटा
कोंदटलेल्या हवेतील तुझ्या आठवणींच्या लाटा.
-बाजी दराडे
Marathi Poem of Love
म्हणून तर हरवते भान,
समोरच्याच्या चुकांचेही होते
म्हणुनच तर गुणगान…
-बाजी दराडे
तू असता वाटे हा आभास आहे
चित्त भरकटता मनी उठी तरंग
मार्ग होइ धुसर आत्ममग्न मी
तूझे काय तू होतोस निंसंग
वरी हे सर्व तूझ साठी म्हणे
माझी होई घालमेल
न कळेना तू सत्य कि आभास
-बाजी दराडे
गुपित तुझ्या माझ्यातलं,
डोळे उघडून जातात
चारचौघात नकळत मनातलं….
-बाजी दराडे
कधी स्वप्न जगुन पहा,
कधीतरी स्वप्नांच्या दुनियेला
वास्तवात घेऊन जा..
-बाजी दराडे
थोडे जास्तच झाले माझे,
तिच्या ओघळलेल्या आसवांचे
मनावर अजूनही अवजड ओझे.
-बाजी दराडे
Marathi kavita Marathi Charolya
तुझी सोबत असण्याची,
मनाला खंत लागुन असते
जवळ तुझ्या नसण्याची…
-बाजी दराडे
माझं मलाच वाटतं वेगळं बघ,
माझा मीच एकाकी गुन्हेगार होतो
विरोधात उभं असतं तुझं जग
-बाजी दराडे
जाणुन बुजून करणं तुझं,
भरकटत जाताना तुझ्यासवे
कसंतरी सावरणं माझं
-बाजी दराडे
गेलीस असे काही मांडून,
माझ्या अस्तित्वाला नकळत
ठेवले तुझ्यातच सांडून
-बाजी दराडे
नाते तुटत नाही,
भूतकाळातले क्षण
आठवणींत मिटत नाही.
-बाजी दराडे
जसा चाफ्याचा मंद गंध,
हरपते देहभान तुझ्यासवे
श्वासांनाही तुझाच छंद
-बाजी दराडे
लाजुन हासणे अन ….
हासून ते पाहणे….
मी ओळखुन होतो ….
तिचे मोबाईल गुंग होणे…..
-बाजी दराडे
पण गंध चोहीकडे उधळतो,
विसरून सारे एकाकीपण
रांगडा चाफाही गंधाळतो
-बाजी दराडे
Marathi Charolya on life
साळसूदपणे #परकी वागतात,
खोट्या #जखमा खोटीच फुंकर
बेमालूमपणे खोटं जगतात
-बाजी दराडे
तरी प्रवास अबोल भावनांतून होतो,
ह्या डोळ्यातला मोती क्षणात
समोरच्या डोळ्यातुन ओघळतो…
-बाजी दराडे

तुला खरंच झेपेल का.?
ढगाआड चंद्र लाजून
लपला चालेल का?
जवळच असूनही तुझ्यापासून
दूर राहीले तर खपेल का. ?
इतकं प्रेम करूनही
व्यक्त झाले नाही तर
मनाला तूझ्या रूचेल का..?
आठवणींनी कंठ दाटून आला तर
माझं मन कुठे रमेल का..?
प्राजू 💞
कधी नवं हवं असतं,
वेळेनुसार कधी कधी
वेगळंच काही हवं असतं…
सिहांची शिकार करणार
सगळे भ्रष्टाचारी आत्ता
देश भ्रष्टाचार मुक्त करणार
माया ममता गोड झाल्या
एक झाला लालू बालू
शरदाच्या चांदण्यात आपण
चला जय बांगला बोलु…..
Marathi kavita Marathi Charolya
अजून त्याला वेळ आहे,
तोपर्यंत तरी असू दे
मुक्या मुक्याने खेळ आहे
बंध बांधते जगाला
नको नको त्या भावनेत,
मी तुझ्या समीप जरी
तरी नसे मी तुझ्या कवेत
डाव मांडलेला जसा कि
आडोसा नाजूक पापणीचा,
नजरेआड झालो जरी मी
खेळ आहे आठवणींनीचा
एक थेंब भावनेचा
डाव पछाडला माझा
आयुष्याच्या सांजवेळी
सवंगडी मीच तुझा —
-बाजी दराडे
वाट पकडुनी कान्हा
बघतील असे कुणी
नको नको म्हणताना
लटकी हि माया तुझी
लटकाच तुझा खेळ
सांग कान्हा घरी दरी
कसा बसवायचा मेळ
-बाजी दराडे
काळ्या तुझ्या केशसंभारात
मला गं मी अलगद गुंतविले
मुग्ध तुझ्या नजरेने तु मला सोडविले
-बाजी दराडे